पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा लग्न करणार; कोण आहे नववधू?

punjab-cm-bhagwant-maan- Dr. Gurpreet Kaur-marriage-to-tie-knot-chandigarth-tomorrow-with-dr-gurpreet-kaur-news-update
punjab-cm-bhagwant-maan- Dr. Gurpreet Kaur-marriage-to-tie-knot-chandigarth-tomorrow-with-dr-gurpreet-kaur-news-update

चंदीगड: आम आदमी पक्षाचे AAP नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan Punjab CM) पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत.(Bhagwant Mann Marriage) भगवंत मान यांचा सहा वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. त्यांची पहिली पत्नी आणि मुले अमेरिकेत स्थायिक झाले आहे. भगवंत मान यांची दोन्ही मुले शपथविधी सोहळ्याला आली होती. भगवंत मान यांच्या आईची इच्छा होती, भगवंत मान यांनी दुसरं लग्न कराव. भगवंत मान यांचा विवाह डॉ. गुरप्रीत कौरशी (Dr. Gurpreet Kaur) होणार आहे.

भगवंत मान यांचे लग्न चंदीगडमध्ये गुरुवारी होणार आहे. अशी माहिती एएनआय़ने दिली आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही खास व्यक्तींचाच सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. भगवंत मान हे 48 वर्षांचे असून, ते दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. भगवंत मान यांनी पहिली पत्नी इंद्रप्रीत कौरपासून घटस्फोट घेतला आहे. त्यांना दोन मुले आहेत, जी कौर यांच्यासोबत अमेरिकेत राहतात.

भगवंत मान यांचा प्रवास…

कॉमेडियनमधून राजकारणी झालेले भगवंत मान 2014 मध्ये पहिल्यांदाच संगरूरमधून खासदार झाले. त्यानंतर त्यांची पत्नी इंद्रजीत कौरही त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरली होती. मात्र, 2015 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. भगवंत मान यांनी 2019 मध्ये संगरूरमधूनही निवडणूक जिंकली होती. पण 2022 मध्ये ते पंजाबमध्ये ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले.

भगवंत मान यांनी 16 मार्च 2022 रोजी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. घटस्फोटानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली होती ज्यात त्यांनी राजकारणासाठी पत्नीपासून वेगळे होत असल्याचे ननुद केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here