धक्कादायक: कोरोनाबाधिताने शेकडो लोकांना वाटला प्रसाद; ३० जण पॉझिटिव्ह

punjab-gurudwara-covid-positive-person-distributes-prasad-to-hundreds-of-people-30-people-infected-news-update
punjab-gurudwara-covid-positive-person-distributes-prasad-to-hundreds-of-people-30-people-infected-news-update

संगरूर l पंजाबमधील संगरूर येथील गुरुद्वारात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. करोनाबाधित व्यक्तीने शेकडो लोकांना प्रसाद वाटल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. प्रसाद घेणाऱ्या व्यक्तींमध्ये एक मंत्री आणि माजी आमदाराचाही समावेश आहे. या घटनेनंतर गावातील ३० जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.Punjab-gurudwara-covid-positive-person-distributes-prasad-to-hundreds-of-people-30-people-infected-news-update

कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. कोरोनाचं संकट पाहता प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचं सर्रास उल्लंघन झाल्याचंही पाहायला मिळत आहे.

यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनसारखा कठोर निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही काही जणांच्या निष्काळजीपणाचा फटका इतरांना बसत असल्याचं दिसत आहे. पंजाबचे शिक्षण मंत्री विजय सिंगला आणि संगरुरचे माजी आमदार प्रकाश चंद गर्ग यावेळी उपस्थित होते. त्यांनीही करोनाबाधित व्यक्तीच्या हातून प्रसाद घेतला.

या बातमीनंतर आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. कोरोनाबाधित व्यक्तीची ३१ मे रोजी चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याची जाणीव असूनही तो गुरुद्वारामध्ये प्रसाद वाटण्यासाठी गेला होता. यावेळी शेकडो लोकं गुरुद्वारात प्रसाद घेण्यासाठी आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here