चंदीगड l पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी (Panjab New CM) चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु होती. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये अनेक नावे होते. परंतु यामध्ये सर्व नावांना मागे टाकून चर्चेत नसलेले चरणजीत सिंह चन्नी यांनी बाजी मारली आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता चरणजीत सिंह चन्नी यांचा शपथविधी होणार आहे.
काँग्रेस हायकमांडकडून यापुर्वी अंबिका सोनी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आहे. यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु होती. पंजाब मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस नेते सुखजिंदर रंधावांच्या नावावर पंजाब काँग्रेसचे एकमत झालं असल्याच्या चर्चा सुरु होत्या परंतु आता चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
पंजाब काँग्रेसकडून दलित नेत्याला मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड काँग्रेसमध्ये एकमताने करण्यात आली आहे. तसेच त्यांची विधीमंडळ गटनेते म्हणून निवड करण्यात आली असल्याचे काँग्रेस ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी सांगितले आहे.
It gives me immense pleasure to announce that Sh. #CharanjitSinghChanni has been unanimously elected as the Leader of the Congress Legislature Party of Punjab.@INCIndia @RahulGandhi @INCPunjab pic.twitter.com/iboTOvavPd
— Harish Rawat (@harishrawatcmuk) September 19, 2021
रविवारी संध्याकाळी चरणजीत चन्नी राज्यपालांची भेट घेतली. चन्नी यांचा चमकूर साहीब हा विधानसभा मतदारसंघ आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे विरोधक मानले जातात. चन्नी हे दलित समुदायाचे नेते आहेत. तसेच आतापर्यत ३ वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आले आहेत. तत्कालीन कॅप्टन अमरिंदर सरकारमध्ये चन्नी औद्योगिक आणि तंत्र शिक्षणमंत्री म्हणून कामकाज पाहत होते
सोनी यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाबाबत होणाऱ्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. सोनी यांनी म्हटलं आहे की, मी स्वतः मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंदिगढमध्ये बैठका घेत आहेत. तर पर्यावेक्षक सर्व आमदारांची बैठक घेऊन पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करत आहेत.
माझा विश्वास आहे की, पंजाबचा पुढील मुख्यमंत्री हा सीख असावा असे काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये शीख मुख्यमंत्री होणार नाही तर कोणार होणार, मी पक्षाचा सम्मान करते परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी नाही घेऊ शकत असे अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे. सध्या अंबिका सोनी दिल्लीत आहेत.