नवी दिल्ली: देशावर कोविडचे सावट असताना केंद्र सरकारशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) दिल्लीत दाखल झाली आहे. या यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर जोरदार टीका केली. चीनमध्ये कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडायला आलो आहोत. तुम्ही देखील प्रेमाचा छोटसं दुकान सुरू करा. निवडून आलेले लोकच द्वेष पसरवत आहेत. शेतकरी हातात हात घालून चालत आहेत. आम्ही ३ हजार किमीहून अधिक चाललो आहोत. या प्रवासात कोणालाही त्याची जात किंवा धर्म विचारला गेला नाही, असंही राहुल यांनी म्हटलं.
मैं जब कन्याकुमारी से चला तब मुझे एक बात पता चली कि इस देश में नफरत नहीं है, इस देश में सिर्फ मोहब्बत है। नफरत सिर्फ मीडिया वाले दिखाते हैं : @RahulGandhi जी#BharatJodoYatra pic.twitter.com/Jnh5jPi1EL
— Congress (@INCIndia) December 24, 2022
दरम्यान यात्रेत फक्त प्रेम आणि आदर आहे, बेरोजगारी आणि महागाईविरोधात आमचा प्रवास आहे, असंही ते म्हणाले. आमचा प्रवास द्वेषाच्या विरोधात आहे. आम्ही एका भारतीयाला आणि दुसऱ्या भारतीयाला आलिंगन देतो. माझ्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटतं का ? मी ३००० किलोमीटर चाललोय. पण मी थकलो नाही, तुम्ही मला शक्ती दिली, असंही राहुल यांनी सांगितलं.