मोदी शेतक-यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहेत;राहुल गांधीचे टीकास्त्र

rahul-gandhi-twitter-reaction-on-farm-bills-slams-narendra-modi-government
राहुल गांधींचा केंद्रावर निशाना rahul-gandhi-twitter-reaction-on-farm-bills-slams-narendra-modi-government

नवी दिल्ली : विरोधी पक्षांनी या विधेयकांना शेतकरी विरोधी आणि कृषी-विरोधी बिले असल्याचा आरोप केला आहे. राज्यसभेत कृषी बिलांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी बिलांबाबत मोदी सरकारवर निशाणा साधत प्रश्न उपस्थित केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम बनवित आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.

राज्यसभेतील शेतकरी विधेयकावरील चर्चेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी रविवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मोदी सरकारच कृषिविरोधी ‘काळा कायदा’ आहे. एपीएमसी / किसान बाजार संपल्यावर एमएसपी कसे मिळणार? मोदी जी शेतक-यांना भांडवलदारांचा गुलाम बनवित आहेत, जे देश कधीही यशस्वी होऊ देणार नाही.”मोदी किसान विरोधी असं हॅशटॅग दिला आहे.

राहुल गांधी यांनी अलीकडेच मोदी सरकारच्या शेतक यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनावर निशाणा साधला. ते म्हणाले, “मोदींनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, परंतु मोदी सरकारचे ‘काळे’ कायदे शेतकरी-शेतमजुरांचे आर्थिक शोषण करण्यासाठी बनविले जात आहेत. हे ‘जमींनदार’ आणि मोदींचे एक नवीन रूप आहे मोदिजींचे काही ‘मित्र’ नवीन भारताचे ‘जमींनदार’ असतील. कृषी बाजार संपला आहे, देशाची अन्न सुरक्षा मिटविली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here