राहुल गांधींच्या ईडी चौकशी प्रकरणी काँग्रेसची औरंगाबादेत भाजप विरोधात पोस्टरबाजी

rahul-gandhis-ed-probe-in-aurangabad-city-congress-president-Hisham osmani -poster-campaign-against-bjp-news-update-today
rahul-gandhis-ed-probe-in-aurangabad-city-congress-president-Hisham osmani -poster-campaign-against-bjp-news-update-today

औरंगाबाद: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या वरील ईडी कारवाईच्या निषेधार्थ शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी (Hisham osmani) यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात बॅनर लावले. ईडी तो बहाना है भाजपा सरकार को अपने घोटाले और नाकामी छुपाना है. या आशयाचे एक हजार बॅनर 19 जून रोजी शहरभर लावण्यात आले.

काँग्रेस पक्षाचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने केलेली चौकशीच्या निषेधार्थ शहरात 17 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर रविवार 19 जून रोजी काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शहरभर बॅनर लावत केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकारच्या 11 निर्णयावर विचारले सवाल…

बॅनरवर केंद्र सरकारच्या 11 निर्णयावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित करत त्या निर्णयाविरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारने राजकीय सूडबुद्धीने डीडीची कारवाई केली आहे. त्याच्या निषेधार्थ शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष यांनी बॅनर लावले. बॅनर वर भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच बॅनरवर बेरोजगारी, देशातील घसरती अर्थव्यवस्था, वाढती महागाई, कोरोना महामारी हाताळताना केंद्र सरकारला आलेले वैफल्य, राफेल घोटाळा, नोटबंदी, जीएसटी टॅक्स, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ, विफल राष्ट्रीय सुरक्षा नीती मुळे शेजारी राष्ट्राचे अतिक्रमण, सर्व धर्म समभाव बिघडवणारे सीएए, एनआरसी सारखे कायदे, शेतकरी विरोधातील तीन काळे कायदे आदी विषयांवर राहुल गांधी यांनी सरकार विरोधात भूमिका घेतली होती. व सरकार विरोधात भूमिका घेतली होती.

म्हणूनच केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूड बुद्धीतून ईडी कारवाई केली. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध अशा आशयाचे बॅनर शहरभर काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी शहरभर लावले.

शहरात 1 हजार पोस्टर्स

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड तसेच भाजपच्या कार्यालयासमोर पोस्टर्स लावण्यात आले. राहुल गांधी यांनी जे प्रश्न केंद्र सरकारला विचारले आहे त्यासंबंधी एक हजार पोस्टर्स लावण्यात  आले. रात्री उशीरापर्यंत शहरात विविध भागात पोस्टर्स लावण्याचे काम सुरु होते.

भाजपा नेत्यांचा थयथयाट

काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी शहरात भाजप सरकारची पोलखोल पोस्टर्स लावल्यामुळे भाजप नेत्यांनी त्याचा विरोध केला. परंतु त्यांच्या विरोधाला न जुमानता रात्री उशीरापर्यंत पोस्टर्स लावण्याचे काम सुरु होते. मात्र, या सर्व प्रकारामुळे भाजप नेत्यांना आता उत्तर देता देता नाकी नऊ येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here