Video l राहुल रॉयचा ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यानंतर पहिला व्हिडीओ, म्हणाला…

rahul-roy-smiling-and-said-i-am-fine-watch-video
rahul-roy-smiling-and-said-i-am-fine-watch-video

बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयला Rahul roy आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्याला मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता राहुल रॉयचा एका व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘मी ठिक आहे’ असे बोलताना दिसतोय.

मुंबईमधील नानावटी रुग्णालयात राहुल रॉयवर उपचार सुरु आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला राहुल रॉयचा व्हिडीओ रुग्णालयातील आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘मी ठिक आहे’ असे बोलताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत राहुल रॉयला काळजी घेण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

राहुल रॉय ‘LAC- Live the Battle चित्रीकरणात होता व्यस्त

राहुल रॉय त्याचा आगामी चित्रपट ‘LAC- Live the Battle’च्या चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु चित्रीकरणादरम्यानच त्याची अचानक तब्येत बिघडली. त्याला प्रोग्रेसिव्ह ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती समोर आली होती. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा : अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here