Mahad Building Collapse : महाड इमारत दुर्घटना, 60 जणांना बाहेर काढण्यात यश

Raigad building collapse incident: 60 rescued,
Raigad building collapse incident: 60 rescued,

रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड शहरात सोमवारी (24 ऑगस्ट) रात्री भीषण इमारत दुर्घटना घडली (Raigad Mahad Building Collapse). दुर्घटनेत 5 मजली इमारत जमीनदोस्त झाली आहे. यात 41 कुटुंब राहत होते. त्यातील 60 जणांना बाहेर काढलं.( Raigad building collapse incident 60 rescued). आतापर्यंत या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण अद्याप अडकल्याची शक्यता आहे.

एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. जखमींवर महाडच्या देशमुख रुग्णालयात उपचार सुरु आहेत “एनडीआरएफचे तीन पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 60 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप 40 जण अडकल्याची शक्यता आहे”, अशी माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 8 तव, 10 जेसीबी, 4 पोखलेन तसेच, 15 डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाली आहे. इमारत दुर्घटनेतील दोषींवर महाड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचेदोषींवर कारवाई केली जाईल – एकनाथ शिंदे (नगरविकास मंत्री)

ही अंत्यत दुर्दैवी घटना आहे. ही इमारत पत्त्या सारखी कोसळली आहे. अजून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं जात आहे. अगदी निकृष्ट दर्जाचे काम केलं होतं. जो कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जे जखमी आणि मृत पावले आहेत त्यांना सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. शहरात ज्या जुन्या इमारती आहेत, त्यासाठी क्लस्टर योजना आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here