शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत; राज ठाकरेंचा पुन्हा हल्लाबोल

raj-thackeray-criticize-sharad-pawar-on-atheism-mention-supriya-sule-in-aurangabad-news-today-update
raj-thackeray-criticize-sharad-pawar-on-atheism-mention-supriya-sule-in-aurangabad-news-today-update

औरंगाबाद: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. शरद पवार यांच्यासाठी खास काही वेगळे संदर्भ आणले आहेत असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांची यादीच वाचून दाखवली. तसेच शरद पवार यांनी आपल्याला हवं तेवढंच न वाचता हे सर्व वाचावं असा टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांना नास्तिक म्हटल्याने त्यांना बोचलं असं म्हणत सुप्रिया सुळेंचा (Supriya Sule) संदर्भ दिला. ते रविवारी (१ मे) औरंगाबादमधील सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार सांगतात दोन समाजात दुही माजवत आहेत. हे देशासाठी, राज्यासाठी चांगलं नाही. शरद पवार जातीजातीत दुही निर्माण करत आहेत त्याने दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचं. हातात पुस्तक घेतल्यानंतर आधी लेखक पाहायचा. शरद पवार नास्तिक आहे असं मी म्हटलो तर ते त्यांना लागलं. मला जे माहिती ते मी सांगितलं. मग मंदिरांमधील फोटो यायला लागले.”

 “सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक”

“सुप्रिया सुळे संसदेत बोलल्यात की माझे वडील नास्तिक आहेत. जिकडे सभा घेतात तिकडे सांगतात राज ठाकरेंनी आजोबांची पुस्तकं वाचली पाहिजे. शरद पवारांनी जे हवं ते न वाचता सगळी पुस्तकं वाचा. मी सर्व वाचलंय. ते सर्व वाचलं तर ते परिस्थितीला धरून आहे, व्यक्तिसापेक्षा आहे. जातीपातीत भेद निर्माण करणारं नाही. हिंदू धर्माची पूजा करणारा माणूस होता तो. धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारा व्यक्ती होता. माझे आजोबा भटभिक्षुकांच्या विरोधात होते.” असं राज ठाकरे म्हणाले.

“सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा होते”

राज ठाकरे म्हणाले, “मी शरद पवारांसाठी काही संदर्भ आणले आहेत. माझ्या आजोबांचं चरित्र आहे ‘माझी जीवनगाथा’. त्यावर पान क्रमांक १०१ वर म्हटलं आहे, हिंदू धर्माच्या प्रचाराबाबत केलेलं काम आणि ख्रिश्चन मिशनरींना विरोध म्हणून हिंदू मिशनरी चळवळ स्थापन करणारे माझे आजोबा होते. सार्वजनिक नवरात्र उत्सव सुरू करणारे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. त्यांचं एक पुस्तक आहे ‘उठ मराठ्या उठ’. या पुस्तकात हिंदू धर्मियांवरील अत्याचाराची माहिती आहे. शरद पवार यांनी जरूर वाचावं.”

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here