Rajiv-kapoor l अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

rajiv-kapoor-passes-away-due-to-heart-attack-in-mumbai
rajiv-kapoor-passes-away-due-to-heart-attack-in-mumbai

मुंबई: राज कपूर यांचे धाकटे चिरंजीव आणि अभिनेते राजीव कपूर Rajiv-kapoor यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं passes-away. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.

राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे छोटे बंधू आहेत. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेंबूरमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

रणधीर यांनी स्वतः राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, ‘आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here