दिपिकाची NCB करणार चौकशी,रणवीरने केली ’ही’विनंती

दिपिकाची शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमोर होणार चौकशी

ranveer-singh-letter-to-ncb-to-let-him-join-deepika-padukon-during-enquiry
दिपिकाची NCB करणार चौकशी,रणवीरने केली ’ही’विनंती ranveer-singh-letter-to-ncb-to-let-him-join-deepika-padukon-during-enquiry

मुंबई : ड्रग्स खरेदी प्रकरणात कथितरित्या दीपिका पदुकोण (Deepika Padukone)  आणि तिच्या मॅनेजरचे काही व्हॉट्सअप चॅट सुद्धा समोर आले आहेत. या प्रकरणात दिपिकाची शनिवारी ( 26 सप्टेंबरला )चौकशी होणार. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) चौकशीदरम्यान दिपिकासोबत हजर राहण्याची विनंती रणवीर सिंह याने मागणी केली. (Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry) अशीही माहिती समोर आली आहे

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB ) चे समन्स मिळाल्यानंतर सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला गेलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) काल रात्री मुंबईत दाखल झाली आहे. तिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला आपण 26 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे कळवले आहे. दीपिकाला डिप्रेशनचा त्रास असल्याने या चौकशी दरम्यान दीपिकाच्यासोबत राहता यावे म्हणून रणवीर सिंहने (Ranveer Singh) एनसीबीला विनंती केली आहे.

या सगळ्या दरम्यान गोव्याहून परतल्यामुळे आज (25 सप्टेंबर) दिपिकाची कोव्हिड टेस्ट (Corona Test) होण्याचीही शक्यता आहे. या टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर ती चौकशीला सामोरी जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

दिपिकाला नैराश्य (डिप्रेशन)चा त्रास असल्याचे कारण देत रणवीरने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB)ला पत्र लिहून चौकशीदरम्यान दीपिकासोबत राहण्याची परवानगी मागितली आहे. मात्र अद्याप (NCB) ने यावर उत्तर दिलेले नाही. (Ranveer Singh wrote letter to NCB to let him join Deepika padukon during enquiry)

दीपिकाचे नाव या प्रकरणात येताच एनसीबीने समन्स बजावल्याने तिचा पती अभिनेता रणवीर सिंहही काळजीत आहे. रणवीर सिंग व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून सतत दीपिकाच्या (Deepika Padukone) संपर्कात राहत होता.

Deepika padukone and Ranveer singh
Deepika padukone and Ranveer singh

कथित चॅटमध्ये अडकली दीपिका

दीपिका आणि श्रद्धा कपूरचे नाव सुशांत सिंहची टॅलेंट मॅनेजर जया साहाच्या चौकशीत समोर आले आहे. तर, मॅनेजर करिश्मा प्रकाश सोबतचे व्हॉट्स अ‍ॅप चॅटही NCB च्या हाती लागले आहेत. त्या कथित चॅटमध्ये दीपिका करिश्माला विचारते, ‘तुझ्याकडे माल आहे का’? करिश्मा यावर रिप्लाय देते की, ‘हो… पण घरी

एनसीबीच्या तीन ठिकाणी धाडी

तत्पूर्वी एनसीबीच्या टीमने सकाळी मुंबईत तीन ठिकाणी धाड टाकून तपास केला. ही ठिकाणे कोणती हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरम्यान, एनसीबीने आजच दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिला देखील चौकशीसाठी बोलावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here