रोहित शेट्टीचा ‘कार’नामा; रणवीरने शेअर केला पाहा भन्नाट video

ranveer-singh-shares-rohit-shettys-behind-the-fun-video
ranveer-singh-shares-rohit-shettys-behind-the-fun-video

दिग्दर्शक रोहित शेट्टी Rohit-shetty आणि त्याचं गाड्यांवरचं प्रेम काही नवीन नाही. वेगवेगळ्या कार आणि कार स्टंट ही तर रोहित शेट्टीच्या सिनेमांची खास ओळख आहे. रोहितचं हेच कारप्रेम पुन्हा एकदा समोर आलं आहे. रोहित सध्या ‘सर्कस’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात रणवीर सिंग Ranveer-singh मुख्य भूमिकेत आहे. तर जॅकलीन फर्नांडीस, पूजा हेगडे हे कलाकार या सिनेमात पाहायला मिळतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

सर्कस’च्या सेटवरचा एक व्हिडिओ रणवीर सिंहने नुकताच केला शेअर

‘सर्कस’च्या सेटवरचा एक व्हिडिओ रणवीर सिंहने नुकताच शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीर सिंहचा फक्त आवाज एकू येत आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शेट्टी एक लहानशी कार चालवत असल्यास दिसतंय. अगदी एखाद्या Jaguar कारप्रमाणे दिसणारी ही लहानशी कार रोहित चालवत आहे. सर्कस सिनेमाच्या सेटवर फावल्या वेळात रोहित या कारसोबत खेळत होता. त्याच्या नकळतपणे रणवीरने त्याचा हा व्हिडीओ शूट केला आहे.

असं म्हणत रणवीरने केलं रोहितचं कौतुक 

या व्हिडिओच्या सुरुवातीला रणवीर सिंगने रोहितचं कौतुक केलं आहे. जगातील सर्वात अवघड कार स्टंट दिग्दर्शक असं म्हणत रणवीरने रोहितचं कौतुक केलं आहे. ‘रोहितचं काम मनावर घ्या’ असं कॅप्शन रणवीरने व्हिडिओला दिलंय. या व्हिडिओवर अर्जुन कपूरनं कमेंट केलीय. हा व्हिडिओ पाहून मलाही या सर्कसमध्ये एण्ट्री घ्यावी वाटतेय असं अर्जुन म्हणाला आहे.

हेही वाचा

डॉन अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

IPL 2021 Auction: 292 खिलाड़ियों की फाइनल लिस्ट जारी, देखें पूरी लिस्ट

पडळकरांकडून शरद पवारांवर टीकास्त्र; जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुतळा अनावरणावरुन राडा

Royal Enfield Himalayan 2021 भारतीय बाजार में लॉन्च,जानिए कीमत और नए फीचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here