Buldhana Rape Case l बुलढाणा जिल्हयात अपंग मुलीवर बलात्कार

अपंग मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार

rape-of-a-disabled-girl-in-buldhana-district
rape-of-a-disabled-girl-in-buldhana-district

बुलढाणा l बुलढाणा जिल्हय़ाच्या संग्रामपूर तालुक्यातील काकनवाडा खुर्द येथे एका नराधमाने अपंग मुलीवर दिवाळीच्या दिवशी दुपारी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. Buldhana Rape Case

पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. काकनवाडा खुर्द येथील आरोपी सोपान गजानन रसाळे (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सोपान गजानन रसाळे याने एका २१ वर्षीय जन्मत: बोलता येत नसलेल्या अपंग मुलीला शौचालयात नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या प्रकारामुळे काकनवाडा खुर्द गावात संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा l संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊंवर पलटवार

घटनेच्या वेळी मुलगी व तिची आई नळावरून पाणी भरत होती. रिकामे भांडे भरून आणण्यासाठी गेलेली मुलगी बराच वेळ घरी परतली नाही. सर्वत्र शोधशोध केला. बराच वेळा झाला मुलगी दिसत नसल्यामुळे घरच्या मंडळीची चिंता वाढली.

दरम्यान, एका घरासमोरील प्रसाधनगृहात ती रडत असल्याचा आवाज आल्यावर पाहिले असता आरोपी सोपान रसाळे बळजबरीने अत्याचार करीत असल्याचा प्रकार समोर आला.

हेही वाचा l Video l कतरिनाचा धमाकेदार बेली डान्स

दरम्यान, आरोपीला चोप देऊन पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. आईने थेट तामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळालं. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here