आज दिनांक 25 ऑक्टोबर 2021. सोमवार अश्विन कृष्ण पंचमी. चंद्र आज मिथुन राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष
कामाच्या ठिकाणी काही बदल संभवतात. रखडलेले काम मार्गी लागेल. तुमचा राशी स्वामी मंगळ रवि सोबत तूला राशीत राशीत स्थित असून जिद्द, चिकाटी वाढवेल. प्रवास होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस चांगला आहे.
वृषभ
अचानक धनलाभ, होईल. शिक्षणात रुची वाढवणारा काळ आहे. पंचम स्थानातील सूर्य मंगळ संतती संबंधी काही घटना घडतील घरातील शांतता भंग होऊ देऊ नका. खर्च बेताने करा. दिवस शुभ.
मिथुन
राशीतील चंद्र गुरूशी नवपंचम योग करीत आहे, त्यामुळे मानसिक स्थैर्य मिळेल आणि आध्यात्मिक प्रगती होईल. भावंडाची गाठभेट होईल. वाद नको. दिवस उत्तम जाईल.
कर्क
व्यय स्थानातील चंद्र आज प्रकृती थोडी नाजूक ठेवेल. सर्दी पडसे इत्यादी तक्रारी असतील. कामाच्या ठिकाणी ताण वाढेल. खर्च होईल. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल. दिवस मध्यम जाईल.
सिंह
लाभ स्थानातील चंद्र मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. प्रवास योग येतील. घरांमधे महत्त्वाचा बदल होईल. नवीन लोकांच्या गाठीभेटी होतील. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस शुभ आहे.
कन्या
राशीच्या धन स्थानातील शुक्र केतू iबुद्धी अणि आकर्षक व्यक्तिमत्त्व बहाल करेल. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. सौंदर्य प्रसाधन, कपडे ,दागिने यावर खर्च होणार आहे. दिवस चांगला जाईल.
तुला
भाग्य स्थानातील चंद्र शुभ असुन आज काहींना अचानक प्रवासाचे योग येतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. आरोग्य ठीक असेल. मित्र मैत्रिणींना वेळ द्यावा लागेल. दिवस उत्तम.
वृश्चिक
आज प्रकृती थोडी सांभाळा. अष्टमात चंद्र मानसिक अणि शारीरिक त्रास दाखवत आहे. योग्य ती काळजी घ्या. शुभ काळ येणारच आहे. दिवस मध्यम.
धनु
वैवाहिक जीवनात काही संघर्षाचे प्रसंगी येतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलण्यात यावेत. प्रकृती सांभाळा. कार्य क्षेत्रात शुक्र शुभ फळ देणारा ठरेल. दिवस मध्यम आहे.
मकर
षष्ठ चंद्र आज नातेवाईक भेट सुचवतो आहे. दशम मंगळ आहे. ऑफिसमध्ये सतर्क रहा. कुठलेही वाद नको. आर्थिक निर्णय उद्यावर ढकला. हाताखालच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. दिवस चांगला.
कुंभ
आज तुमची अडकलेली काम मार्गी लागतील.
आर्थिक व्यवहार सांभाळून करा. संतती हट्टी पणे वागेल. जोडीदाराला सांभाळून घ्या. पण जमेल तितकी काम उरकून घ्या. दिवस शुभ.
मीन
आज नवीन परिचय होतील. खर्च खूप होतील..घरांमधे काही जास्तीची काम आटपून घ्याल. महत्त्वाचा पत्र व्यवहार होईल. घराकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिवस चांगला जाईल.