Rashibhavishya: नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला करा माता चंद्रघंटा पूजन; पाहा आजचा दिवस कसा?

आज दिनांक 9 ऑक्टोबर 2021 शनिवार. आज अश्विन शुद्ध तृतीया/चतुर्थी. नवरात्राची तिसरी माळ. आज माता चंद्र घंटा पूजन केले जाते. वाचा आजचं तुमच्या राशीचं भविष्य

rashibhavishya-marathi-todays-horoscope-16-october-rashifal-update
rashibhavishya-marathi-todays-horoscope-16-october-rashifal-update

Horoscope 9 October Rashifal आज दिनांक 9 ऑक्टोबर 2021 शनिवार. आज अश्विन शुद्ध तृतीया/चतुर्थी. आज विनायक चतुर्थी आहे. नवरात्राची तिसरी माळ. आज माता चंद्र घंटा पूजन केले जाते. जी सुवर्ण वर्ण आहे, दशभुजा आहे, दिव्य अशी आयुधं  जिने धारण केली आहेत, जिच्या मस्तकावर अर्ध चंद्र आहे अश्या मातेला त्रिवार नमन. हिचे पूजन केल्याने अद्भूत अणि दिव्य अनुभव येतात. विशिष्ट सुगंध किंवा नाद ऐकू येतात. मणिपूर  चक्र जागृत होते. माता सिंहारूढ आहे. तृतीयेच्या पूजेला विशेष महत्व आहे. या दिवशी  देवीला फुलांचा शृंगार केला जातो. आदिमाया सर्वांचे रक्षण करो  हीच प्रार्थना.

आज चंद्र तुला राशीत असून रवि बुध मंगळ कन्या राशीत आहेत. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र भ्रमण अनुकूल असून दिवस  आनंदात जाईल जोडीदारा सोबत विशेष खरेदी कराल. घर आणि व्यवसाय दोन्ही साठी दिवस शुभ आहे .

वृषभ

आज जास्तीच्या कामांना खूप वेळ द्यावा लागेल .त्यामुळे थकवा येईल. अंगदुखी  ,सर्दी पडसे इत्यादी पासून जपून रहा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस चांगला जाईल.

मिथुन

पंचमातील चंद्र भ्रमण उत्तम आध्यात्मिक अनुभव देणार आहे.  व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. तुमच्या हस्ते काही मोठे काम होईल ज्यायोगे तुमचे नाव होईल. दिवस शुभ आहे.

कर्क

आज चा दिवस घरात जास्तीची काम करण्याचा आहे  म्हणजे आठवडा व्यवस्थित जाईल. कामाचे  नियोजन करा. तृतीय मंगळ क्रोधावर नियंत्रण ठेवा असे सुचवत आहे. दिवस शुभ.

सिंह

तृतीय स्थानात आलेला चंद्र गुरूशी केंद्र योग योग करीत आहे. अतिशय उत्तम दिवस. धार्मिक गोष्टी मध्ये मन रमेल.  छोटासा प्रवास योग. दिवस आरामात जाईल.

कन्या

आज धनस्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल असून आर्थिक भरभराट करणार आहे. शुक्राचे भ्रमण चैनीच्या गोष्टीवर खर्च करायला लावेल. जपुन खर्च करा. दिवस उत्तम.

तुला

राशीतील चंद्र गुरूशी  केंद्र योग करीत आहे  आध्यात्मिक अनुभव येतील. तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही भाग्य खेचून आणाल. लाभ होतील. दिवस उत्तम.

वृश्चिक

व्यय स्थानातील चंद्र आज शारीरिक कष्ट, आर्थिक व्यय दाखवित आहे. लौकरच भाग्य आणि कर्म यांची उत्तम साथ लाभणार आहे. तेव्हा सगळ्या कष्टांची फळ मिळतील. दिवस मध्यम.

धनु

अष्टमातील ग्रह स्थिती नुसार आज प्रवास टाळा. दिवस लाभदायक असून फार दगदग ना करता पार पडेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दिवस उत्तम.

मकर

आज चा दिवस शांतपणे घरात व्यतीत कराल. लहानसहान समारंभात  भाग घेणार आहात. आर्थिक बाजू ठीक.  शुक्र उत्तम लाभ मिळवून देईल. दिवस चांगला आहे.

कुंभ

भाग्य कारक दिवस. कन्या राशीतील सूर्य मंगळ शत्रू पिडा करतील. आर्थिक बाजु चांगली राहील. आरोग्य  थोडे  सांभाळावे लागेल . आज योग्य ती काळजी घ्या. आराम करा. दिवस मध्यम आहे.

मीन

आज ग्रहस्थिती कष्ट  देणारी असून कोणते ही धाडस करू नका. वाद टाळा. शारीरिक कष्ट असतिल तर घरात आराम करा. नाम जप करा. मानसिक हुरहूर जाणवेल. दिवस मध्यम जाईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here