Ration card : आता तुमचं रेशन कार्ड एटीएम कार्डसारखं होणार!

केंद्राकडून 84 कोटी नागरिकांना एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड

ration-card-will-change-under-the-one-nation-one-ration-card-scheme-samrt-card
ration-card-will-change-under-the-one-nation-one-ration-card-scheme-samrt-card

मुंबई l वन नेशन वन रेशन कार्ड योजना one-nation-one-ration-card scheme आता नव्या वर्षात नव्या रुपात दिसणार आहे. पिवळं, केशरी आणि पांढऱ्या रंगाचं तुमचं रेशन कार्ड आता एटीएम कार्डासारखं Smart card होणार आहे. केंद्र सरकारकडून central government जवळपास 84 कोटी नागरिकांना आता एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे.

केंद्र सरकारने रेशन कार्डमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारकडून जवळपास 84 कोटी नागरिकांना आता एटीएम कार्ड सारखं स्मार्ट रेशन कार्ड दिलं जाणार आहे. त्याची सुरुवात बिहारमधून करण्यात आली आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा फायदा देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर तुमचं रेशन कार्ड आता देशातील कुठल्याही राज्यात चालणार आहे. 

नोकरीसाठी अन्य राज्यांत गेलेल्या नागरिकांना, विस्थापित झालेल्या मजुरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्यांदा देशाला संबोधित करताना देशातील 80 कोटींपेक्षा अधिक गरीब लोकांना मोठा दिलासा दिला होता. पंतप्रधानांनी गरीब कल्याण योजना नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यावेळी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजना लागू करण्याचा मुद्दाही उपस्थित केला होता.

वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत सध्या जुन्या कार्डवरच धान्य मिळत आहे. तुम्ही ज्या राज्यात आहात, तिथे तुमच्या जवळील रेशन दुकानदाराकडे जाऊन तुम्ही रेशन कार्ड बनवू शकता. तिथे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इतकच नाही तर तुम्ही स्वत:ही ऑनलाईन अर्ज करु शकता.

हेही वाचा : संजय राऊत शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा’; पडळकरांचं राऊतांना पत्र,वाचा जसेच्या तसे

तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्ही आधार कार्ड लिंक करुनही रेशनचा लाभ मिळवू शकता. त्यासाठी तुमच्याकडे बीपीएल कार्ड असणं गरजेचं आहे. त्यासह काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

रेशन कार्ड बनवण्यासाठी प्रत्येक राज्याचे वेगवेगळे पोर्टल आहेत. त्यावर बीपीएल कार्डधारक रेशन कार्डसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मिळालेली पोचपावती तुम्हाला तहसील कार्यालयात अन्न पुरवठा अधिकाऱ्याकडे द्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here