रत्नागिरीत भीषण अपघात; चिंतामणी ट्रॅव्हल्स् 50 फूट खोल दरीत कोसळली

ratnagiri- chintamani travels-collapsed-in-kashedi-ghat-with-27-passengers-seven-year-boy-died-
ratnagiri- chintamani travels-collapsed-in-kashedi-ghat-with-27-passengers-seven-year-boy-died-

रत्नागिरी : कशेडी घाटात तब्बल 50 फुट दरीत चिंतामणी ट्रॅव्हल्स् कोसळली.Bus Collapsed In Kashedi Ghat आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बसमधील 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मदत कार्य सुरु आहे.

मुंबईच्या सायन येथून कणकवलीकडे जाणारी चिंतामणी नावाची आराम बस पहाटे चार वाजता कशेडी घटातील 50 फुट दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण 27 प्रवासी होते. त्यापैकी 25 जणांना बाहेर काढण्यात आले आहेत.

या प्रकरणी मदत कार्य जोरात सुरु आहे. या बसमधील बहुतेक प्रवासी हे संगमेश्वर येथील रहिवाशी आहेत. या अपघातात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. एक वृद्ध गाडीत अडकले.

 हेही वाचा  : Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का शर्मा

जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकांमधून तसेच शासनाच्या 108 रुग्णवाहिकांमधून 25 जखमी प्रवाशांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

 हेही वाचा : सोन्याचा बर्गर खाण्यासाठी लोक लावत आहेत रांगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here