Rave Party l शाहरुख खानचा मुलगा आर्यनची ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून चौकशी!

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही.

Rave Party-ncb-interrogates-shah-rukh-khan-son-aryan-khan-in-mumbai-rave-party-case-news-update
Rave Party-ncb-interrogates-shah-rukh-khan-son-aryan-khan-in-mumbai-rave-party-case-news-update

मुंबई l नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून करण्यात आलेल्या मोठ्या ड्रग्ज कारवाईत बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शहारुख खानचा (ShahRukh Khan)  मुलगा आर्यन खान (Shah Rukh Khan’s son Aryan Khan) याला अटक करण्यात आली (NCB arrest Actor Shah Rukh Khan’s son Aryan Khan)आर्यनसह ८ जणांना देखील एनसीबीने ताब्यात घेतले आहे. एकूण दहा जणांना केलेल्या अटकेत २ महिलांचा देखील समावेश असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे. सध्या आर्यन खानसह इतरांची एनसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे. ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या दोन महिला या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समोर येत आहे.

मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही.

याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे. तसेच क्रूझवरून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्वांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत आणि सर्व तपशील देखील तपासले जात आहेत.

ठोस माहिती मिळाल्यानंतर, मुंबई झोनल संचालक समीर वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकारी सामान्य प्रवासी म्हणून जहाजावर चढले होते. मुंबई सोडल्यानंतर जहाज समुद्राच्या मध्यभागी पोहोचताच रेव्ह पार्टी सुरू झाली. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. एनसीबीने सात तास तपास करत. बॉलिवूड कलाकाराच्या मुलासह १० लोकांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर सर्वांना मुंबईत आणण्यात आले.

सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. मात्र, तपास अद्याप सुरू आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी संध्याकाळी प्रवासी क्रूझवर छापा टाकण्यात आला, जिथे पार्टी चालू होती आणि त्यात ड्रग्जचे सेवन केले जात होते. हे जहाज गोव्याला जाणार होते आणि त्यावर शेकडो प्रवासी होते. जहाजावर पार्टी असल्याची माहिती मिळताच एनसीबीच्या पथकाने छापा टाकला. काही प्रवाशांकडून प्रतिबंधित अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here