Smart TV: नवा TV फक्त ९९९ रुपयांमध्ये घरी आणा!

realme-smart-tv-neo-is-a-32-inch-smart-tv-available-on-flipkart-for-just-rs-999-news-update-today
realme-smart-tv-neo-is-a-32-inch-smart-tv-available-on-flipkart-for-just-rs-999-news-update-today

Smart TV Offer: जर तुम्ही ३२ इंचाचा चांगला टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला स्वस्तात मस्त टीव्ही खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर जबरदस्त डील आणि सवलती दिल्या जात आहेत. तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. प्रचंड सवलती, बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि अगदी EMI पर्यायांसह हा टीव्ही उपलब्ध आहे आणि या सर्व ऑफर लागू केल्या तर हा टीव्ही तुम्ही फक्त ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. चला, तर जाणून घेऊया कोणत्या स्मार्टटीव्हीवर आहे ही जबरदस्त ऑफर.

‘या’ स्मार्ट टीव्हीवर आहे ऑफर

या ऑफर अंतर्गत Realme चा Realme Smart TV Neo हा स्मार्टटीव्ही स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या टीव्हीमध्ये ३२ इंच एलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये, TUV Rheinland प्रमाणित लो-ब्लू लाइट सपोर्ट आहे. ज्यामुळे युजर्सच्या डोळ्यांचे हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. याशिवाय, क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसर,२० डब्ल्यू ड्युअल स्पीकर्स आणि डॉल्बी ऑडिओ Realme Smart Tv Neo मध्ये असतील. तसेच, या टीव्हीमध्ये क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन आहे, जे व्हिडिओ गुणवत्ता सुधारते.

 Realme स्मार्ट टीव्हीची किंमत आणि ऑफर

फ्लिपकार्टवर प्लॅटफॉर्मवर (realme NEO 80 cm (32 inch) HD रेडी LED Smart Tv) स्मार्ट टीव्ही २१,९९९ च्या किमतीवर मिळू शकतो. ज्यावर कंपनी सध्या ४५ टक्के म्हणजेच १०,००० रुपयांची सूट देत आहे. या ऑफरनंतर तुम्ही फक्त ११,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता. बँक ऑफर्सबद्दल बोलत असताना, फेडरल बँक क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड आणि पंजाब नॅशनल बँक क्रेडिट कार्डच्या ग्राहकांना पूर्ण १० टक्के झटपट सूट देखील दिली जात आहे. त्याच वेळी, Realme NEO स्मार्ट टीव्हीवर EMI पर्याय देखील उपलब्ध आहे. म्हणजेच, जर तुम्हाला हा टीव्ही हप्त्यांवर घ्यायचा असेल, तर तुम्हाला तो फक्त ४१६ रुपयांच्या मासिक हप्त्यावर मिळेल.

९९९ मध्ये खरेदी करता येणार

जर तुम्हाला हा स्मार्ट टीव्ही फक्त ९९९ रुपयांमध्ये खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर ११,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनसचा लाभ मिळवावा लागेल, याचा अर्थ जर तुम्हाला जुन्या टीव्हीवर ११,००० पर्यंत सूट मिळत असेल तर हा टीव्ही तुम्ही फक्त रु.९९९ मध्ये खरेदी करू शकता.

Realme Smart TV Neo ची वैशिष्ट्ये

रियलमी स्मार्ट टीव्ही निओ स्मार्ट टीव्हीमध्ये ३२ इंचाचा डिस्प्ले आहे. याला TUV Rheinland प्रमाणित निळा प्रकाश देण्यात आला आहे. तसेच, यात ६४ -बिट क्वाड कोर मीडियाटेक प्रोसेसर, एआरएम कॉर्टेक्स-A35 सीपीयू आणि माली 470 GPU अधिक चांगल्या कामगिरीसाठी आहे. या व्यतिरिक्त, टीव्हीमध्ये उत्कृष्ट चित्र गुणवत्तेसाठी क्रोमा बूस्ट इंजिनचा देखील सपोर्ट असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here