PNB Scam : फरार मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस मागे; आता जगभर प्रवासाला परवानगी

red-corner-notice-withdrawn-by-interpol-against-fugitive-mehul-choksi-pnb-13000-crore-rupees-scam-news-update-today
red-corner-notice-withdrawn-by-interpol-against-fugitive-mehul-choksi-pnb-13000-crore-rupees-scam-news-update-today

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील (PNB Scam) १३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलच्या ‘रेड नोटीस’मधून फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसी याचं नाव हटवण्यात आलं आहे. चोक्सी फ्रान्सच्या लियोन शहरातील इंटरपोलच्या मुख्यालयात दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे हे पाऊल उचलण्यात आले आहे. दुसरीकडे सीबीआयने मात्र या सगळ्या घडामोडीवर मौन बाळगले आहे.

इंटरपोलने २०२८ मध्ये चोकसी विरोधात रेड नोटिस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर नोटिस जारी करण्यात आली होती. त्याच वर्षी चोक्सी अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्विकारले होते.

चोक्सी आपल्याविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याच्या सीबीआयच्या अर्जाला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्राचा परिणाम असल्याचे म्हटले होते. चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. रिपोर्टनुसार, चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. त्यानंतर आता समितीने सुनावणीनंतर रेड नोटीस रद्द केली आहे.

 चोक्सी मे २०२१ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा येथून गूढपणे गायब झाला. यानंतर तो शेजारचा देश डॉमिनिकामध्ये दिसला. तेथे त्याला अवैध मार्गाने देशात घुसल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. चोक्सीला डॉमिनिकामध्ये पकडल्याची बातमी समोर आल्यानंतर भारताने त्याच्याविरुद्ध इंटरपोलच्या रेड नोटीसच्या आधारे त्याला परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

सीबीआयच्या डीआयजी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांचे पथकही तेथे गेले, परंतु त्याच्या वकिलांनी डॉमिनिका उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तीही मान्य करण्यात आली. अशा स्थितीत चोक्सीला भारतात आणता आले नाही. तेथे ५१ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर चोक्सीची जुलै २०२१ मध्ये जामिनावर सुटका झाली.

मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने १४ हजार कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. २०११ ते २०१८ या कालावधीत बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज (LoU) द्वारे रक्कम विदेशी खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. या घोटाळ्यात सीबीआयने चोक्सी आणि नीरव मोदी या दोघांविरुद्ध स्वतंत्र आरोपपत्र दाखल केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here