नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन मुंबई लोकल बंद आहे. ऑक्टोबरच्या दुस-या, तिस-या आठवड्यात लोकल सुरु होणार अशी अपेक्षा होती. रेल्वेमंत्री पियुष गोयल म्हणाले की, राज्य सरकारच्या मागणीनंतरच मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबई लोकलसाठी केंद्राकडून रेड सिग्नल आहे. त्यामुळे लोकलसेवेचा निर्णय सध्या गुलदस्त्यात आहे. (Red signal from Centrel government for Mumbai Local)
जून-जुलैच्या दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामध्ये हळूहळू सर्व गोष्टी सुरु केल्या जात आहेत. येत्या काही दिवसात सिनेमागृहदेखील सुरु करण्याची शक्यता आहे. मुंबईसह देशभरात बसेस सुरु झाल्या आहेत. लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या व विमानेदेखील सुरु करण्यात आली आहेत. मात्र अद्याप मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला नाही. काही दिवसांपूर्वीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑक्टोबरच्या दुस-या,तिस-या आठवड्यापर्यंत लोकल सेवा सुरु होईल. केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत अशी माहित दिली होती.
गोयल म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने मुंबई लोकल सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही. त्यामुळे जर आमच्याकडे प्रस्तावच आला नाही तर मुंबई लोकल सुरु करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्य सरकार आमच्याकडे प्रस्ताव पाठवेल तेव्हाच आम्ही त्याबाबतचा निर्णय घेऊ. असं सांगितलं.
वाचा : Amazfit Neo स्मार्टवॉच भारतात लाँच
डोंबिवली या ठिकाणाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी पोहचण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्यांना लोकलने जाण्याची मुभा आहे. मात्र सामान्य प्रवाशांसाठी लोकल कधी सुरु होणार हा प्रश्न कायम आहे. लोकल लवकर सुरु केली जावी अशी मागणी केली जाते आहे. मात्र अद्याप ठाकरे सरकारने प्रस्ताव दिला नसल्याचं उत्तर पियूष गोयल यांनी दिलं आहे.
सध्याच्या घडीला सामान्य प्रवाशांना ऑफिस गाठायाचं असेल तर दोन ते तीन तास प्रवासाचे हाल सहन करावे लागत आहे. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी यातून मार्ग काढावा लागतोय. अशात ऑक्टोबरच्या मध्यात मुंबई लोकल सामान्यांसाठीही सुरु केली जाईल असं ठाकरे सरकारकडून सांगण्यात आलं.
वाचा : प्रियंका गांधींचे मोदी सरकारला हाथरस प्रकरणी पाच प्रश्न
दरम्यान केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना याबाबत विचारलं गेलं असता ठाकरे सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता मुंबईतली लोकल सामान्यांसाठी कधी सुरु होणार हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे मुंबई लोकल सुरु होण्याबाबतचा संभ्रम कायम आहेे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, लोकलबाबतचा निर्णय थोडा घाईचा ठरेल.रुग्णसंख्या वाढत आहेत. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.