Xiaomi शाओमीचा स्मार्टफोन झाला स्वस्त;पाहा किंमत, दमदार फीचर्स

redmi-8a-dual-price-in-india-cut-by-xiaomi-check-new-price-and-specifications
redmi-8a-dual-price-in-india-cut-by-xiaomi-check-new-price-and-specifications

शाओमी Xiaomi कंपनीचा बजेट स्मार्टफोन Redmi 8A dual आता स्वस्त झाला आहे. रेडमी इंडियाने ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने या फोनच्या तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे.

Redmi 8A dual हा फोन म्हणजे कंपनीच्या रेडमी 8A ची पुढील आवृत्ती आहे. या स्मार्टफोनमध्ये गोरिल्ला ग्लास 5, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि फास्ट चार्जिंग यांसारखे फीचर्स मिळतात.

हा फोन सी ब्लू, स्काय व्हाइट आणि मिडनाइट ग्रे या तीन नवीन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसह 6.22-इंच HD+ डिस्प्ले आहे.

फोनमध्ये 2Ghz क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर असून 2 जीबी आणि 3 जीबी रॅमसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. शिवाय VoWiFi फीचर देखील आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi 8A dual मध्ये दोन रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल. Ai सीन डिटेक्शन आणि Ai पोर्टेट मोड असे फीचर्स कॅमेऱ्यासोबत आहेत.

सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. 5000 mAh ची दमदार बॅटरी असलेला हा फोन 18W फास्ट चार्जरसोबत येतो. याशिवाय फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंगचं फीचरही देण्यात आलं आहे.

किंमत 

हा स्मार्टफोन तीन व्हेरिअंट्समध्ये येतो. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत आतापर्यंत 7,499 रुपये होती पण आता किंमतीतील कपातीनंतर हा फोन 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

हेही वाचा l FAU-G गेम 24 तासांमध्येच हिट, युजर्सचा तुफान प्रतिसाद

3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हर्जन आता 8,299 रुपयांऐवजी 7 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हर्जन आता 8,999 रुपयांऐवजी 8 हजार 299 रुपयांमध्ये उपलब्ध असेल.  तिन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत अनुक्रमे 500 रुपये, 300 रुपये आणि 700 रुपयांची कपात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here