मुंबई : सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने आज मंगळवारी (8 सप्टेंबर ) अटक केली. रविवारी सकाळी नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने रिया चक्रवतीच्या घरी जाऊन तिला समन्स बजावला होता. ड्रग्ज प्रकरणी रियाची चौकशी सुरु होती.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो ( NCB) ने सुशांत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनचा तपास करत आहे. आतापर्यंत सुशांतचा मदतनीस दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद विलात्रा, शोविक चक्रवती (रियाचा भाऊ), सॅम्युअल मिरांडा आणि अब्बास लखानी या 6 जणांना अटक करण्यात आली आहे. कॅजन इब्राहिमला देखील अटक केली होती, मात्र शनिवारी त्याला कोर्टातून जामिन मिळाला.
ड्रग्स प्रकरणात दीपेश सरकारी साक्षीदार बनणार आहे. आज त्याच्या साक्षची प्रक्रिया पूर्ण होईल. एनसीबी शोविकला रियासमोर बसून चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एनसीबीने शोविक व मिरांडाला कोर्टात सादर केले. कोर्टाने दोघांना 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात सोपवले.
अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितले की, दीपेश सावंतला समोरासमोर बसवून शोविक व इतरांच्या चौकशीची गरज आहे. रियाच्या अटकेच्या प्रश्नावर एनसीबी अधिकारी म्हणाले, ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सुरू आहे. एनसीबीने कैझान इब्राहिमलाही कोर्टापुढे हजर केले. कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.








































































































































