कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका; २४ तास खूप महत्त्वाचे

remo-dsouza-suffers-heart-attack-in-icu-24four-hours-improtant
remo-dsouza-suffers-heart-attack-in-icu-24four-hours-improtant

मुंबई l बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाला Remo Dsouza हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे.

“रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असून तो सध्या आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत”, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली आहे.

प्रसिद्ध गाण्यांच्या कोरिओग्राफीशिवाय रेमोने ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये तो परीक्षक म्हणून होता.

हेही वाचा l कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका; २४ तास खूप महत्त्वाचे

‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमधून रेमोचं नाव चर्चेत आलं. टेरेन्स लुईस आणि गीता कपूर यांच्यासोबत त्याने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. नंतर याच रिअॅलिटी शोमधल्या स्पर्धकांना घेऊन त्याने ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला.

बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळाला आणि त्याचसोबत रिअॅलिटी शोमधून पुढे आलेले स्पर्धक सेलिब्रिटी म्हणून प्रकाशझोतात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here