रेणू शर्माचा चौथा कारणामा; मंत्री मुंडेंसह भाजपचे हेगडे, मनसेचे धुरी आणि जेट एअरवेजचे अधिकारी कुरेशींनाही ब्लॅकमेल केलं

रेणू शर्माच्या हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या बड्या नेत्यांची, अधिका-यांची नावे समोर येण्याची शक्यता

Renu-Sharma-dhananjay-munde- Krishna Hegde-manish dhuri-rizwan-qureshi-hunnytrap
Renu-Sharma-dhananjay-munde- Krishna Hegde-manish dhuri-rizwan-qureshi-hunnytrap

मुंबई : धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्माचा Renu sharma चौथा कारणामा समोर आला आहे. धनंजय मुंडे, भाजपचे कृष्णा हेगडे krishna hegde यांच्यानंतर मनसेचे मनीष धुरी Manish dhuri यांनाही रेणू शर्मा ब्लॅकमेल करत होती असा आरोप केला आहे. त्यापाठोपाठ जेट एरवेजचे अधिकारी रिजवान कुरेशी यांनीही रेणू शर्मावर ब्लॅकमेलचे आरोप केले आहेत.

रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी २०१० मध्ये अनुभव घेतलाय, पण मी २००८- २००९ मध्ये फसणार होतो, पण माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही आणि हीचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय, असं मनीष धुरी म्हणाले. धुरी यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना हे गंभीर आरोप केले आहेत.

भाजपचे माजी आमदार,उपाध्यक्ष कृष्णा हेगडे  यांनी ही रेणू शर्मावर गंभीर आरोप केल्याने एका नवा वादाला तोंड फुटलं आहे. यासंदर्भात कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे. रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप हेगडे यांनी केला आहे. 

कृष्णा हेगडे म्हणाले

“मी कोणत्या महिलेवर उगाचच आरोप कशाला करु? धनंजय मुंडे, मनीष धुरी यांच्याबाबतही असं झालं आहे. हे हनी ट्रॅपचं जाळं आहे. आपल्या जाळ्यात पकडून लुटायचं. आज धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं आहे. उद्या माझ्याबाबतही झालं असतं, असे कृष्णा हेगडेंनी सांगितले

“मनीष धुरी यांचाही कॉल आला होता, ते सुद्धा तसंच सांगत होते. ते डायरेक्ट पैसे मागत नाहीत. ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये कोणी असतं, सिंगर असतात, तेव्हा म्युझिक अल्बमसाठी पैशाची गरज असते,” असेही कृष्णा हेगडे म्हणाले.

“मी रेणुला दोनदा भेटलो आहे. रेणू मला वारंवार संपर्क करून रिलेशनशिपबाबत विचार असे, असा आरोपही कृष्णा हेगडेंनी केला. कोणा महिलेला बदनाम करून मला काही मिळणार नाही, मात्र दोन तीन जणांशी ती असं वागली आहे. म्हणून आता तक्रार नोंदवली. माझ्यासाठी हा राजकीय मुद्दा नाही. धंनजय मुंडे यांना मी ओळखत नाही,” असेही कृष्णा हेगडेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा : धनंजय मुंडेंवर आरोप झाले, मग काय त्यांना फासावर चढवायचं का? – शिवसेना

मनीष धुरी काय म्हणाले?

2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता, जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे.

कृष्णा हेगडेंनी २०१० मध्ये अनुभव घेतलाय, पण मी २००८- २००९ मध्ये फसणार होतो, पण माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही आणि हीचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय, असं मनीष धुरी म्हणाले.

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कृष्णा हेगडेंचं पोलिसांना पत्र 

भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी याबाबत मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले.

मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here