धनंजय मुंडेंच्या विरोधातील बलात्काराची तक्रार अखेर मागे!

renu-sharma-withdraws-rape-case-against-ncp minister-dhananjay-munde
renu-sharma-withdraws-rape-case-against-ncp minister-dhananjay-munde

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे Dhananjay-munde यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून वादात अडकले  होते. मात्र,बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा Renu-sharma या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. तशाप्रकारे पोलिसांना गुरुवारी(दि.२१जानेवारी) लेखी निवेदन दिलं असल्याचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्माने म्हटलंय.

बलात्काराच्या आरोपांमुळे महाराष्ट्रात उडाली होती खळबळ

धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता.

रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

हेही वाचा: अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी आज काँग्रेसचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसवर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशीही चर्चा होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here