दाऊद इब्राहिमला भारतात आणा, राष्ट्रवादीच्या आमदाराची पंतप्रधानांकडे मागणी

param-bir-singh-letter-ncp-mla-rohit-pawar-criticizes-leader-of-opposition-devendra-fadnavis-and-other-bjp-leaders

मुंबई : अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे. (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India)

महाराष्ट्रात प्रथमच युतीचं सरकार आलं होतं तेव्हा भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफट आणू असं सांगितलं होतं. सत्तेत असताना दाऊदला का आणलं नाही अशी टीका त्यांच्यावर विरोधकांनी केली होती. त्यानंतर भाजपच्या ब-याच नेत्यांनी प्रचाराच्या दरम्यान दाऊदला पकडून आणू असे वक्तव्य केले होते.

“दाऊद इब्राहीम कराचीत असल्याचं पाकिस्तानं कबूल केलं आहे. त्याला भारतात आणण्यासाठी सर्वोत्तोपरी प्रयत्न करा, अशी मी पतंप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो. दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणा”, असं रोहित पवार म्हणाले आहेत (Rohit Pawar Demand to PM Narendra Modi to do everything for bring Dawood Ibrahim in India).

दाऊद इब्राहिम कराची शहरात असल्याच्या वृत्ताला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही दुजोरा दिला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.

पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची स्थीर आणि जंगम अशी सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here