मुंबई l राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad pawar यांचा आज ८० वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त special-birthday-wishe त्यांचे नातू व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड’, अशा शब्दांत रोहित पवारांनी Rohit pawar शरद पवारांचं वर्णन केलं.
‘महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा’, असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
कोणत्याही संकटापुढे झुकायचं नाही ही शिकवण आजोबांकडून मिळाल्याचं रोहित पवार यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. “अनेक लोकांना शरद पवार निवृत्त होतील असं वाटलं होतं. पण ते म्हणाले आपण हार मानायची नाही. कितीही संकटं आली तरी झुकायचं नाही, प्रामाणिक वागा, लोकांमध्ये जा, मग कोणीही तुमचा पराभव करु शकत नाही, हे पवार साहेबांकडे पाहून आम्हाला कळतं”, असं ते म्हणाले.
आदरणीय @PawarSpeaks साहेब आपल्या वाढदिवसानिमित्त तुमच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांचं मी सकाळी तुम्हाला दिलेलं पत्र राज्यातील जनतेसाठीही सादर करतोय.
Respected Saheb, on your birthday, sharing a letter given to you in the morning. It’s my humble attempt to pen down my thoughts. https://t.co/QZCc0oHI0x pic.twitter.com/h9pGmMQeYb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 12, 2020
पवारांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला. मुत्सद्दी राजकारणी, शेतीतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून शरद पवार यांची ओळख आहे. राजकीय जीवनात अनेक नेत्यांच्या वाट्याला येतात तसे चढउतार पवारांच्याही वाट्याला आले. मात्र कठीण प्रसंगातही त्यांचा संयम कधी ढळला नाही.