भाजपाला ‘या’ बातमीने आनंद होणार नाही; पण…

उद्धव ठाकरे हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी भाजपाला वाईट वाटून घेऊ नका असा सल्लाही दिला आहे.

anil-deshmukh-clean-chit-from-cbi-ncp-mla-rohilt-pawar
anil-deshmukh-clean-chit-from-cbi-ncp-mla-rohilt-pawar

मुंबई l महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. विरोधी पक्षाकडून मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर सतत होणाऱ्या टीकेवरुन आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांनी भाजपाला चांगलंच खडसावलं आहे. या सर्वेक्षणाचा हवाला देत त्यांनी भाजपाला BJP वाईट वाटून न घेण्याचा सल्ला दिला आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी भाजपाला वाईट वाटून घेऊ नका असा सल्लाही दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपाला या बातमीने आनंद होणार नाही. पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषतः ज्या उत्तरप्रदेश सरकारचं भाजपाकडून नेहमी गुणगान गायलं जातं. तिथल्या मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये.

मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारचं अभिनंदन करताना रोहित पवार म्हणतात, ‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे महाविकास आघाडी सरकारचं यश आहे.

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे.

देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव पटकावलं आहे.

हेही वाचा

बिग ‘बी’ मोठेपणा दाखवा, मनसेची अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टरबाजी

महागाईविरोधात छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; आज ७४ व्या वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here