RSS l राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 निघेल, अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

rss-ideologue-spoksperson-mg-vaidya-passes-away-in-nagpur-maharashtra
rss-ideologue-spoksperson-mg-vaidya-passes-away-in-nagpur-maharashtra

नागपूर l विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे RSS माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य Mg vaidya यांचे शनिवार 19 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजता निधन झाले.

परखड मतांसाठी मा. गो. वैद्य हे यांना ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. आज दुपारी 3.30 वाजता मा. गो. वैद्य यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : परळ ब्रँडशिवसैनिक माजी खासदार मोहन रावले गेले!

अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता

त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्ययात्रा रविवार 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल व अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.

हेही वाचा l नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?;शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना सवाल

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here