Roohi l ‘भूतिया शादी में आपका स्वागत है’; पाहा ‘रुही’ चा ट्रेलर

ruhi-horror-comedy-movie-trailer
ruhi-horror-comedy-movie-trailer

अभिनेत्री जान्हवी कपूर janhvi kapoor आणि अभिनेता राजकुमार राव Rajkummar rao यांचा ‘रुही’ हॉरर कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रुहीचा Roohi ट्रेलर पाहता जान्हवी कपूर एकदम वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिचा हॉरर लूक पाहण्यासारखा आहे. हा ट्रेलर आतापर्यंत ५४ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला राजकुमार आणि वरुण शर्मा जान्हवीला किडनॅप करताना दिसत आहेत. त्यानंतर तिला ते जंगलात घेऊन जातात. दरम्यान जान्हवीचा अभिनय पाहण्यासारखा आहे.

‘स्त्री’ चित्रपटानंतर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा ‘रुही’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ११ मार्चला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘रुही-आफजा’ असे ठेवण्यात आले होते. मात्र या चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. आता ‘रुही’ असे या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्ट प्रदर्शित करण्यात आले होते. “भूतिया शादी में आपका स्वागत है” असे कॅप्शन देत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. राजकुमार रावचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. कॉमेडीचा तडका देण्यासाठी रुही’ सिनेमात राजकुमार राव आणि जान्हवी कपूरसोबत वरुण शर्मा झळकणार आहे. पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना देखील चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक मेहताने केले आहे.

हेही वाचा

West Bengal Election l अभिनेते मिथुन चक्रवर्तीला भाजपचे साकडे; मोहन भागवतांनी घरी जाऊन घेतली भेट

Pooja Chavan Case l माझ्याकडेही भाजपा नेत्यांची महिलांसोबतची डझनभर प्रकरणं;’या’मंत्र्याचा दावा!

54 प्रवाशांनी भरलेली बस सरोवरात कोसळली;मृतदेह काढले बाहेर

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर वाहनांची एकमेकांना धडक; भीषण अपघातात पाच ठार,पाच गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे पर 5 गाड़ियों में टक्कर; 5 लोगों की मौत,5 घायल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here