Sarkari Naukri l ग्रामीण विकास मंत्रालयाच्या ‘या’ संस्थेत निघाल्या 510 सरकारी नोकर्‍या, 12 वी पास व पोस्ट-ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

Rular development minister in central government depeatment job recruitment
Rular development minister in central government depeatment job recruitment

नवी दिल्ली l भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्वायत्त संस्था, राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थे (एनआयआरडीपीआर) ने 510 पदांवर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. Rular development minister in central government depeatment job recruitment

संस्थेने जाहीर केलेल्या भरती जाहिराती (सं.16/2020) नुसार 10 राज्य कार्यक्रम समन्वयक, 250 यंग फेलो आणि 250 क्लस्टर रिसोर्स पर्सन या पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांची भरती राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्पासाठी दोन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. तथापि, उमेदवारांची नेमणूक सुरूवातीस एका वर्षासाठी केली जाईल, त्यानंतर प्रकल्प सुरू ठेवणे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निर्णयाच्या आधारावर यास पुढे वाढविले जाऊ शकते.

ऑनलाईन अर्ज करावा

इच्छुक उमेदवार एनआयआरडीपीआरचे अधिकृत संकेतस्थळ career.nirdpr.in वर उपलब्ध करण्यात आलेल्या ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2020 निश्चित करण्यात आली आहे.

पात्रतेचे निकष

राज्य कार्यक्रम समन्वयक

मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेकडून सामाजिक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी. उमेदवाराला दहावीमध्ये किमान 60 टक्के आणि 12 वी, पदवी आणि पीजीमध्ये किमान 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच 1 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवाराचे वय 30 वर्षांपेक्षा कमी आणि 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

यंग फेलो

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेकडून सामाजिक विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी. दहावीमध्ये उमेदवाराने किमान 60 टक्के आणि 12 वी, पदवी आणि पीजीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळवले असावेत. तसेच, 1 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

क्लस्टर रिसोर्स पर्सन

मान्यताप्राप्त बोर्डमार्फत बारावी किंवा समकक्ष पात्रता उत्तीर्ण. तसेच पाच वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव. 1 नोव्हेंबर 2020 रोजी उमेदवाराचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

हेही वाचा : रावसाहेब दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा की पाकिस्तानचा; बच्चू कडू दानवेंवर संतापले  

पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो ;अजित पवार मोदी सरकारवर खवळले

फर्जी बैंकिंग ऐप से सावधान, नहीं तो खाली हो जाएगा अकाउंट; ऐसे करें फ्रॉड की पहचान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here