टि्वटर वाद l शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ सल्ला!

sachin-tendulkar-should-took-care-while-talking-on-other-subjects-sharad-pawar-advice
sachin-tendulkar-should-took-care-while-talking-on-other-subjects-sharad-pawar-advice

पुणे: आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने Pop star Rihanna सर्व प्रथम शेतकरी आंदोलनाला farmers protest समर्थन देणारे टि्वट केल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले. रिहाना Rihanna ग्रेटा थनबर्ग Greta Thunberg आणि मिया खलिफा Mia khalifa या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्या विरोधात भूमिका घेतली. 

भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली. त्या विषयावर, आज पुण्यात कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला.

“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.” असे शरद पवार म्हणाले.

“इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असे शरद पवार म्हणाले.

“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले.

“सर्वोच्च स्तरावर जर प्रयत्न केला, तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.

सचिन तेंडुलकरने केलं होतं हे टि्वट
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

हेही वाचा : 

राज ठाकरेंचा वीजबिल सवलतीच्या मुद्दयावरुन शरद पवारांवर गंभीर आरोप; म्हणाले…

पाकिस्तान-चीनच्या सीमेवरही इतका बंदोबस्त बघितला नाही; राज ठाकरे मोदी सरकारवर संतापले  

फडणवीसांना त्यासाठीमाझ्या मनापासून शुभेच्छा : संजय राऊत

Chakka Jam: कृषि कानूनों के विरोध में किसानों का चक्‍का जाम आज, क्या खुला, क्या बंद यहां जानें सब

Petrol-Diesel Price Today: आपल्या शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव काय?; एका क्लिकवर जाणून घ्या

farmers protest : शेतकरी आंदोलनावर UN Human Rightsचं ट्विट; दिला हासल्ला

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here