
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सुरु केलेल्या कल्चरल सेंटरची अजूनही मनोरंजन विश्वात चर्चा सुरु आहे. कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील कलाकारांची जत्रा भरली होती. यावेळी रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, सलमान खान, शाहरुख खान असे अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले.
हा सोहळा खुपच गाजला. मग त्यात प्रियंका आणि रणबीर सोबतच शाहरुखचा डान्स असो किंवा वरुण धवनचा गीगीसोबतच चा व्हायरल डान्सवरुन वाद. मात्र याच कार्यक्रमात आणखी एका गोष्टीची बरिच चर्चा रंगली.
ती म्हणजे बॉलिवूडचा भाईजान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची. त्यादोघांचे बरेच व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले.
आता याच प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे, जो पाहून सलमान आणि ऐश्वर्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ज्यांना सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची जोडी पुन्हा एकत्र पाहण्याची इच्छा होती असे चाहते तर खुपच आंनदी झाले आहेत.
वास्तविक या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान एकत्र पोज देत आहेत आणि आराध्या बच्चन सुद्धा दिसत आहे. 20 वर्षांनंतर एकत्र दिसलेल्या दोघांच्या या व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल झाला असून चाह्त्यांना या व्हिडिओ मागचं सत्य जाणुन घेण्याची उत्सुकता आहे.
View this post on Instagram
सलमान आणि ऐश्वर्याच्या या व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडमध्ये ‘मैने प्यार किया’ चित्रपटाचे गाणे वाजत असून तिघेही कॅमेऱ्यासमोर हावभाव देवुन पोज देताना दिसत आहेत. समोरचा कॅमेरामनही त्याला पोज देण्यास सांगत आहे.
मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये काहीही तथ्य नाही. हा व्हिडीओ एक प्रँक व्हिडिओ आहे, ज्याने दोघांचे वेगवेगळे व्हिडीओ एडिट करून एकत्र केले आहेत आणि ते अगदी खरे दिसत आहेत. आश्चर्य व्यक्त करताना, अनेकांनी म्हटले आहे की हा व्हिडिओ अगदी खराचं दिसतोय.