मुघलांच्या काळात भारताचा जीडीपी २५ टक्के होता; काँग्रेसचा हल्लाबोल

salman-nizami says-mughal-rule-india-gdp-was-25-percent
salman-nizami says-mughal-rule-india-gdp-was-25-percent

नवी दिल्ली : काँग्रेस नेते सलमान निझामी यांनी जीडीपीसंदर्भातील माहिती जाहीर झाल्यानंतर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुघलांच्या काळात भारताचा जीडीपी २५ होता आणि आता पाहा अशा अर्थाचे ट्विट करुन केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे.

भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने नेते सलमान निझामी यांनी तर मुघलांच्या काळात भारताची परिस्थिती अधिक चांगली होती असा टोला केंद्र सरकारच्या धोरणांवर लगावला आहे.

काँग्रेस नेते सलमान निझामी यांनी जीडीपीसंदर्भातील ट्विट वरून सोशल मीडियामध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे मोदी समर्थक आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दीक देवाणघेवाण झाली. त्यानंतर सलमान यांनी ट्विटरवरुन आपली भूमिका स्पष्ट करणारा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

“भाजपाचे नेते मुघलांना रोज शिव्या देतात. मात्र खरं हे आहे की मुघलांच्या कालावधीमध्ये भारताचा जीडीपी २५ टक्के इतका होता आणि आज वजा २३.९ टक्के इतका आहे. अकबराच्या काळात भारतीय लोकं अमेरिकन लोकांपेक्षा श्रीमंत होते. आज शेजारच्या बांगलादेशची अर्थव्यवस्था ही भारतापेक्षा चांगल्या स्थितीत आहे,” अशी कॅप्शन या व्हिडिओला सलमान निझामी यांनी दिली आहे.

दोन मिनिटं २० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सलमान निझामी यांनी मुघलकाळापासून आतापर्यंत जीडीपीमध्ये कसा बदल झाला आहे याबद्दल मत मांडले आहे. “भाजपाचे नेते दिवसरात्र मुघलांना शिव्या देतात. काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या देतात. नेहरुंना शिव्या देतात. मात्र मुघल काळात आपल्या देशाचा जीडीपी २५ टक्के होता. एकेकाळी तर ३० टक्क्यांपर्यंत होता भारताचा जीडीपी.

अकबर भारतावर राज्य करत होता तेव्हा भारत हा अमेरिकेपेक्षा श्रीमंत होता

जेव्हा अकबर भारतावर राज्य करत होता तेव्हा भारत हा अमेरिकेपेक्षा श्रीमंत होता. त्यानंतर भारतावर ब्रिटीशांची सत्ता आली. त्यांनी भारताला लुटलं तरी ब्रिटीशांच्या काळात भारताचा जीडीपी चार टक्के इतका होता. २५ वरुन जीडीपी चारवर आला. स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसकडे सत्ता आली. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंग यासारख्या नेत्यांनी नेतृत्व केलं. त्यावेळी देशाचा जीडीपी १० टक्क्यांवरुन अगदी १२ पर्यंत गेला होता.

रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त येतो अशी एक म्हण आहे ना त्याप्रमाणे

मनमोहन सिंग काही बोलत नाही असे आरोप झाले. त्यांच्या कालावधीमध्ये देशाचा जीडीपी १० ते १२ टक्क्यांदरम्यान होता,” असं सलमान म्हणाले. पुढे बोलताना सलमान निझामी यांनी, “रिकाम्या भांड्याचा आवाज जास्त येतो अशी एक म्हण आहे ना त्याप्रमाणे आहे हे. मनमोहन सिंग शांत असायचे, कमी बोलायचे मात्र सर्वात उत्तम पंतप्रधान होते. भाजापच्या कार्यकाळात कोरोना असू द्या किंवा त्याआधीचे सहा वर्ष असू द्या. या कालावधीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे आपल्या सर्वांसमोर आहे असंही सलमान निझामी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here