मुंबई:‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. आज पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. संभाजी भिडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यावेळी महिला पत्रकारने विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ”तू आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलतो” असे वादग्रस्त विधान केले आहे.
काय घडलं?
संभाजी भिडे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले असताना साम टिव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना याबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना त्यांनी ”प्रत्येक स्त्री भारतमातेस्वरूप असते. भारतमाता ही विधवा नाही. त्यामुळे तू आधी कुंकू लाव, मगच मी तुझ्याशी बोलतो”, असे वादग्रस्त विधान केले.