
मुंबई : माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय राऊत (sanjay-raut) यांनी मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये भेट झाली. राऊत-फडणवीस या दोन्ही नेत्यांनी भेटीचा खुलासा केला तरी सुध्दा काँग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम ( sanjay nirupam )यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. कंपाऊंडरला हेडलाईन बनवून चर्चेत राहायची भूक लागली असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
ऐसा लगता है शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख लग गई है।
यही भूख अक्सर नेताओं को खा जाती है।
यह दुर्भावना नहीं, एक वास्तविकता है।#GrandHyatt— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 27, 2020
संजय राऊत आणि भाजपाकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केलं असले तरीही या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे माजी खासदार काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. राऊत फडणवीस यांच्या भेटीवर संजय निरुपम यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी राऊतांवर नाव न घेता टीका केली आहे. यात त्यांनी संजय राऊत यांनी याआधी केलेल्या विधानावरही टीकास्त्र सोडलं आहे.
संजय निरुपम आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ” असे वाटतेय की शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहण्याची मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्यांनाच खाते. ही दुर्भावना नसून वास्तविकता आहे.”
गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. या विधानाचाही निरुपम यांनी पुन्हा एकदा समाचार घेतला आहे.
फडणवीस भेटीवर राऊत म्हणाले..
काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस सध्या राज्याचे विरोधी पक्षनेता असून माजी मुख्यमंत्रीही आहेत. तसेच भाजपाने त्यांच्यावर बिहार निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. आमच्यात वैचारिक मतभेद असू शकतात पण आम्ही शत्रू नाही.
फडणवीस यांची भेट ही गुप्तपणे मुळीच नव्हती. आमच्या या भेटीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता. पण कोरोनाच्या काळामुळे शक्य झाली नाही, असे राऊत म्हणाले.