त्र्यंबकेश्वर मंदिरप्रकरणी आता संजय राऊतांकडूनही चौकशीची मागणी; म्हणाले, “गोमूत्रधारी दंगलखोर…”

sanjay-raut-also-demanded-an-inquiry-into-the-trimbakeshwar-temple-case-the-cow-urine-drinkers-sprinkled-cow-urine-they-are-the-rioters-news-update
sanjay-raut-also-demanded-an-inquiry-into-the-trimbakeshwar-temple-case-the-cow-urine-drinkers-sprinkled-cow-urine-they-are-the-rioters-news-update

मुंबई:भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याविषयी पत्रकारांनी संजय राऊतांना विचारले.

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात स्थानिक दुसऱ्या धर्मियांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने एसआयटी गठीत केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याविषयी पत्रकारांनी संजय राऊतांना विचारले. त्यावर राऊत म्हणाले की, “वीर सावरकारांसंदर्भात शिवसेनेने जी भूमिका घेतली आहे ती विज्ञानवादी आणि हिंदुत्त्ववादी होती. सावरकर विज्ञानवादी हिंदुत्ववादी होते. त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमूत्र शिंपडलं. हे सावरकरांना मान्य नव्हतं. नड्डांनी या आधी निषेध करावा”, असं राऊत म्हणाले.

 “हिंदुत्त्वाच्या नावावर महाराष्ट्रात, देशात दंगली घडवण्याचं षडयंत्र सुरू आहे. सावरकरांचं नाव घेऊन त्याचा निषेध कारावा मग त्यांच्या कुटुंबीयांना भेटी द्यावं. गोमूत्रधाऱ्यांनी गोमूत्र शिंपडलं ना ते दंगलखोर आहेत, त्यांची चौकशी करा”, अशी आग्रही मागणीही यावेळी राऊतांनी केली.

 “नार्वेकरांच्या मुलाखतींमधून संभ्रम निर्माण होतोय”

“महाराष्ट्र विधानसभेला एक प्रतिष्ठा आहे. ते घटनात्मक पद आहे. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीनं निष्पक्ष पद्धतीने न्याय करायचा असतो. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अधिवेशन सध्या चालू नाहीये. पण अध्यक्ष परदेशात किंवा इथे येऊन अनेक मुलाखती देत आहेत. त्यातून संभ्रम निर्माण होतोय. यातून प्रकरणावर दबाव निर्माण होतोय की काय असं आम्हाला वाटतंय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी नार्वेकरांवर टीकास्र सोडलंय.

“विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत जाहीर मुलाखती देऊ नयेत असे घटनात्मक संकेत आहेत. न्यायमूर्ती त्यांच्यासमोरच्या खटल्याबाबत आपण काय करणार आहोत, काय करणार नाही अशा मुलाखती देत नाहीत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचं हे कर्तव्य आहे”, असं राऊत म्हणाले.

“त्यांना अभ्यास करण्याची काहीच गरज नाही. हे सगळं घडलं तेव्हा ते तिथेच होते. आधी झिरवळ होते. झिरवळांच्या अध्यक्षतेखालीच राहुल नार्वेकर अध्यक्ष झालेत ना? अभ्यास कसला करताय? एखादा चांगला घटनातज्ज्ञ असेल तर ते संपूर्ण प्रकण २४ तासात उडवून देईल”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊतांनी माफी मागावी

हिंदू महासभेने केलेल्या आरोपांनंतर संजय राऊतांनी त्र्यंबकेश्वर मंदिराला धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षे जुनी असल्याचा दावा केला होता. यानंतर आता तुषार भोसले यांनी संजय राऊतांकडे २४ तासात माफीची मागणी केली आहे. तुषार भोसले म्हणाले, “संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे हे आम्ही घसा ओरडून सांगतो आहे. आज त्यांनी सिद्ध केलं की, त्यांनी केवळ हिंदुत्व सोडलेलं नाही, तर हिंदू धर्मही सोडला आहे. त्र्यंबकेश्वरचे सर्व पुरोहित, विश्वस्त, मंदिर व्यवस्थापन सगळे अशी कोणतीही प्रथा परंपरा नसल्याचं सांगत आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here