farmers protest l संजय राऊत आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी थेट गाझीपूर बॉर्डरवर

bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today
bombay-high-court-denied-stay-on-sanjay-raut-bail-news-update-today

मुंबई: प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay raut आज मंगळवार, दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची farmers groups भेट घेणार आहेत. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thackeray यांच्या सूचनेनंतर भेट घेण्यास जाणार असल्याचेही राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  

“महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत.

कुठलाही संकल्पनसेल तर त्याला अर्थसंकल्पतरी कसे म्हणायचे?; शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. अन्य एका ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले की, किसान आंदोलन झिंदाबाद! will visit protesting farmers at Gazipur today at 1 pm..जय जवान, जय किसान!

केंद्र सरकाच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील जवळपास दोन महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱी संघटनांकडून आज एक आणखी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ६ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनांकडून देशव्यापी चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.

farmers chakka jam: देशभर में 6 फरवरी को तीन घंटे के लिए होगा चक्का जाम, किसान संगठनों ने किया ऐलान

संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याची घोषणा केली आहे. याच दिवशी दुपारी १२ ते ३ या वेळेत सर्व रस्ते देखील अडवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच, दिल्ली व आसपासच्या परिसरात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याबद्दल तसेच, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांबाबत विशेष घोषणा न करण्यात आल्याबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दरम्यान, या घोषणेनंतर आता गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्यात आलेली आहे.

Farmers Protest:सिंघु, टीकरी और गाजीपुर बॉर्डर पर आज रात 11 बजे तक इंटरनेट सेवा बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here