Sanjay Raut : बाप बेटे जेलमध्ये जाणार, कोठडीचे सॅनिटायजेशन सुरु

शिवसेना खासदार संजय राऊतांचे ट्विट

sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news
sanjay-raut-tweet-kirit-neel-somaiya-father-son-will-go-to-jail-sanitization-work-in-progress-wait-and-watch-news

मुंबई: शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेतेमंडळींच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचून दाखवला. किरीट सोमय्या (Kirit somaiya ) आणि नील सोमय्यांचा (Neel Somaiya) भ्रष्टाचाराचा मुद्दा पीएमसी बॅंक घोटाळ्याशी कसा संबंधित आहे, याचा उलगडा त्यांनी केला. पण आज बुधवारी सकाळीच संजय राऊतांच्या ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. आज सकाळीच संजय राऊतांनी ट्विट शेअर करत पुन्हा एकदा किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

काय आहे राऊतांचे ट्विट ?
पीएमसी घोटाळ्यातील पैसे किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याने निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शन कंपनीत वापरल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यामध्ये पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान हा नील सोमय्याचा या कंपनीत पार्टनर होता.

पीएमसी बॅंकेचे पैसे हे निकॉन इन्फ्रा कंस्ट्रक्शनमध्ये वापरल्याचा आरोप राऊतांनी केला. या घोटाळ्याच्या संदर्भानेच संजय राऊतांनी ट्विट केले आहे. 

ट्विटमध्ये म्हटले आहे की, बाप बेटे जेलमध्ये जाणार, Wait and watch! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र!

तर संजय राऊतांच्या ट्विटला उत्तर देताना मोहित कंबोज भारतीयने उत्तर दिले आहे. कंबोजने ट्विट करत म्हटले आहे की, सलीम – जावेद दोनो जेल जाएंगे, Wait and Watch. संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर पत्रा चाळ घोटाळ्याशी संबंधित आरोपांवर मोहित कंबोजने खुलासा केला होता. या पत्रा चाळीच्या प्रकरणात तक्रारदार मी असून माझे पैसे बुडाल्याचा खुलासा त्यांनी केला.

विकासक गुरूआशिषच्या विरोधात पहिली तक्रार करणारा व्यक्ती मी होतो असाही खुलासा कंबोजने केला. तर अनेक आर्थिक अडचणीत संजय राऊतांना पैसे दिल्याचीही माहिती त्यांनी दिली.

अनेकदा गणपतीला संजय राऊत घरी येत असल्याचेही म्हटले आहे. त्यावर ट्विटरवर फोटोही मोहित कंबोजने शेअर केला आहे. तसेच रॉयल मराठा एंटरटेनमेंटला केलेल्या पैशांच्या ट्रान्सफरचा स्क्रिनशॉटही मोहित कंबोजने शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here