
मुंबई:शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज मंगळवारी मुंबईतील शिवसेना भवनात (ShivSena Bhavan) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहेत. स्वतः राऊत यांनी ट्विट करुन याची माहिती दिली. यावेळीही ते भाजपच्या नेत्यांवर शरसंधान साधणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्यावेळी त्यांनी याच ठिकाणी याच वेळेला पत्रकार परिषद घेत भाजपसह (BJP) केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. (Sanjay Raut will hold press conference at Shiv Sena Bhavan today)
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं की, संध्याकाळी ४ वाजता आम्ही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत आहोत. या पत्रकार परिषदेकडे लक्ष राहू द्या, जय महाराष्ट.
Will be addressing a press conference tomorrow 4 pm at shivsena bhavan.
Watch this space.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/xVh8ToHaTs— Sanjay Raut (@rautsanjay61) March 7, 2022
”
यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी भाजपवर निशाणा साधताना पुढील काही दिवसात भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं म्हटलं होतं. भाजपमध्ये किती दम आहे ते पाहू असं थेट आव्हानही त्यांनी यावेळी दिलं होतं.
दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाचा भाजपकडून गैरवापर होत असल्याचं सांगताना या यंत्रणांवर जाणून बुझून ठाकरे कुटुंबियांना बदनाम करण्याचा कट रचला जात असल्याचे गंभीर आरोप केले होते.
त्याचबरोबर विनाकारण या यंत्रणांकडून सत्ताधारी लोकांच्या नातलगांना त्रास दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी राज्यातील शिवसेनेचे नेते आणि मंत्र्यांसह राऊत यांनी मोठ शक्ती प्रदर्शनही केलं होतं.