मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सरदार तारा सिंह यांचे निधन झाले आहे. (BJP leader Sardar Tarasingh died) गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
माझे वरिष्ठ सहकारी, भाजप नेते सरदार तारा सिंह यांचे आज सकाळी लीलावती रुग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा जिंकले
सरदार तारा सिंह हे मुंबईतील मुलुंड मतदारसंघातून सलग चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. सरदार तारा सिंह यांनी मुंबई महापालिकेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं आहे.
अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता राजीनामा
2018 मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा बोर्डच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. गेल्यावर्षी सरदार तारा सिंह यांचा मुलगा रणजित सिंह याला मुंबई पोलिसांनी पंजाब नॅशनल बँक कथित घोटाळ्या प्रकरणी अटक केली होती.





















































































































































































