देशात १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार, पण ‘ही’ आहे अट!

शिक्षण मंत्रालयाने लागू केल्या गाइडलाइन्स

All schools will remain closed until December 31
All schools will remain closed until December 31

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने गाइडलाइन्स लागू केल्या आहेत. टप्प्याटप्प्याने शाळा सुरु होतील. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोज हजर रहावंच लागेल असं नाही त्यासाठी हजर असण्याबाबतची मुभा देण्यात आली आहे.

शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने सोमवारी स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रॉसिजर (एसओपी) जाहीर केली. यानुसार सुरुवातीच्या दोन-तीन आठवडे मुलांचे मूल्यांकन होणार नाही. तसेच, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक सुरक्षेकडेही शाळेला लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या दृष्टीने शाळेत इमरजेंसी केअर टीम बनवावी लागेल आणि पालकांच्या परवानगीनंतरच मुलांना शाळेत बोलवले जाईल.

वाचा : राष्ट्रीवादी काँग्रेसनं ‘एलजीबीटी सेल’ची केली स्थापना

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सांगितले की, गृह मंत्रालयने राज्यांवर निर्णय सोपवला आहे की, राज्यातील परिस्थिती पाहून त्यांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. कोणत्याच मुलाला बळजबरीने शाळेत बोलवले जाणार नाही. तसेच, मुलांची जबाबदारी सर्वस्वी शाळेवर असेल.

शाळेकडे ही जबाबदारी असणार ?

  • संपूर्ण कँपसमध्ये स्वच्छता आणि डिसइन्फेक्शनिंगची व्यवस्था करावी लागेल. फर्नीचर, इक्विपमेंट, स्टेशनरी, स्टोअर, पाण्याच्या टाक्या, किचन, कँटीन, वॉशरूम, लॅब आणि लायब्रेरीची स्वच्छता आणि डिसइन्फेक्शनिंग करावी लागेल. तसेच, इनडोअर स्पेसमध्ये मोकळ्या हवेसाठी जागा करावी लागेल.
  • इमरजंसी केअर सपोर्ट/रेस्पॉन्स टीम, जनरल सपोर्ट टीम, कमोडिटी सपोर्ट टीम, हायजीन इन्सपेक्शनसारख्या कामांसाठी टास्क फोर्स बनवावी लागेल.
  • सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळेत असेपर्यंत मास्क घालावे लागेल.
  • सेफ्टी प्रोटोकॉल, सोशल डिस्टेंसिंगशी संबंधित सायनेज आणि मार्किंग्स लावाव्या लागतील.
  • सर्व वर्गांसाठी अॅकेडमिक कॅलेंडरमध्ये बदल केले जातील.
  • विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रेग्युलर हेल्थ चेकअपची व्यवस्था असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here