ठाकरे सरकारचा दणका; देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटलांसह डझनभर नेत्यांच्या सुरक्षेला कात्री

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय,संघर्ष पेटला

security-reduce-of-devendra-fadnavis-and-other-bjp-leaders-by-maharashtra-govt
security-reduce-of-devendra-fadnavis-and-other-bjp-leaders-by-maharashtra-govt

मुंबई: महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करुन चांगलाच दणका दिला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant patil यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे.

फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे.

तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार,राम नाईक, नारायण राणे यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.

हेही वाचा : देशात नक्की कोणती ‘शाही’?;संजय राऊतांचा भाजपला सवाल

राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार विरुध्द विरोधक असा संघर्ष चांगला रंगणार आहे. 

सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका सुरु आहे. भाजपच्या सर्व नेत्यांनी ठाकरे सरकारवर प्रहार सुरु केला आहे. आमचे कार्यकर्ते आमची सुरक्षा असल्याचे सांगितले आहे. 

Happy birthday Hrithik Roshan: हृतिकच्या वाढदिवसानिमित्त सुझान खानने शेअर केला ‘हा’ खास व्हिडीओ

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here