Voice Of Media: व्हॉईस ऑफ मीडिया’च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सतीश रेंगे यांची निवड

संदीप काळे म्हणाले, आम्ही पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’ घेऊन २१ देशांपर्यंत जाऊन पोहचलो. ४२ हजार पत्रकारांची सदस्य, पदाधिकारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सोबत पत्रकार आणि पत्रकारितेच्या तत्त्वमूल्यासाठी काम करीत आहोत. पुढच्या तीन वर्षांत जगातल्या सर्व जिल्ह्यात, प्रत्येक पत्रकारापर्यंत आम्ही पोहचणार आहोत.

Selection of Satish Renge as Aurangabad District President of Voice of Media
Selection of Satish Renge as Aurangabad District President of Voice of Media

औरंगाबाद:जगभरात अल्पावधीत नावारूपाला आलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांसाठी पंचसूत्री घेऊन काम करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या (Voice Of Media) औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी सतीश रेंगे पाटील  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सतीश रेंगे पाटील यांनी पत्रकारितेमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सेवाभावी वारसा जपला आहे. त्यांच्या जनसंपर्काचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या संघटन बांधणीसाठी फायदा होईल, असा विश्वास निवड प्रसंगी मराठवाडाध्यक्ष विजय चोरडिया यांनी व्यक्त केला.

निवडीनंतर सतीश रेंगे पाटील म्हणाले, येत्या आठ दिवसांत सर्व जिल्हाकार्यकारिणी आणि तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारिणी निवडली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधले सर्व पत्रकार या निमित्ताने एकसंध बांधले जाणार आहेत. या सर्व पत्रकारांच्या सहकार्यातून ऐतिहासिक काम उभे करण्यासाठी आम्हा सर्व टीमचा पुढाकार असेल, असेही रेंगे पाटील म्हणाले.

औरंगाबाद येथे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे  यांच्या प्रमुख उपस्थितीत रेंगे पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी बोलताना संदीप काळे म्हणाले, आम्ही पत्रकारांसाठी ‘पंचसूत्री’ घेऊन २१ देशांपर्यंत जाऊन पोहचलो. ४२ हजार पत्रकारांची सदस्य, पदाधिकारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सोबत पत्रकार आणि पत्रकारितेच्या तत्त्वमूल्यासाठी काम करीत आहोत. पुढच्या तीन वर्षांत जगातल्या सर्व जिल्ह्यात, प्रत्येक पत्रकारापर्यंत आम्ही पोहचणार आहोत.  

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी रेंगे पाटील यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय संघटक परवेज खान, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, पत्रकार शेखलाल शेख, मराठवाडा संघटक किशोर महाजन, साप्ताहिक विंग मराठवाडा अध्यक्ष अब्दुल कय्युम, रवी माताडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here