मुंबई l राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार sharad pawar यांनी एका मुलाखतीत काँग्रेस खासदार राहुल गांधी Rahul gandhi यांच्या नेतृत्वशैलीवर भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात Balasaheb thorat यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस पक्ष संघटीत होतो आहे. त्यांनी जिवनात जे दुःख पाहिलं, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही सावरत ते नेतृत्व करतायत.
शरद पवार यांचं ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो, परंतू ते राहुल गांधी यांना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं.” बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपलं मत मांडलं.
राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत
यावेळी बोलत असताना पुढील काळात राहुल गांधीच पक्षाचं समर्थपणे नेतृत्व करणार आहे असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला. राहुल गांधी जे काम करत आहेत त्यांच्याविरोधात भाजपाच्या यंत्रणा कार्यरत असतात, असंही थोरात म्हणाले.
हेही वाचा l ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यानंतर राहुल रॉयचा पहिला व्हिडीओ, म्हणाला…
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्रातलं सरकार टीकवायचं असेल तर काँग्रेस नेतृत्वावर टीका करणं टाळा असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधली ही धुसफूस समोर आली होती.