महाआघाडी सरकार पुढची अनेक वर्षे चालेल;शरद पवारांनी व्यक्त केला विश्वास

ncp-president-sharad-pawar-slam-bjp-leader-mp-narayan-rane
ncp-president-sharad-pawar-slam-bjp-leader-mp-narayan-rane

मुंबई l महाविकास आघाडी सरकारने Maha vikas aghadi गेल्या वर्षभरात खूप चांगलं काम केलं आहे. हे सरकार किती वर्ष चालेल याबाबत आज शरद पवार Sharad pawar यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात झालेला हा पहिलावहिला प्रयोग आहे. पाच वर्षे सरकार चालेल एवढा कद्रूपणा का करायचा? पुढची अनेक वर्षे हे सरकार चालेल असा विश्वास शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात व्यक्त केला.

कोरोनाचं संकट जगावर आलं. तरीही महाराष्ट्र थांबला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप चांगलं नेतृत्त्व केलं. खरंतर मुख्यमंत्र्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा त्यांना हे सगळं कसं जमेल अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.

मात्र त्यांना प्रशासकीय अनुभव नसला तरीही त्यांच्या चातुर्यात काहीही कमतरता नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. विविध प्रयोग करुन झालेलं सरकार हे महाराष्ट्राने तीनवेळा पाहिली.

सर्वात पहिली जबाबदारी माझ्यावर होती. १९७८ मध्ये झालेला तो प्रयोग हा तसा सोपा राजकीय प्रयोग होता. कारण त्यातले मोजके लोक होते की ज्यांना प्रशासनाचा अनुभव होता.

त्यामुळे राज्याच्या प्रमुखांकडून त्यांच्या फार अपेक्षा नव्हत्या. ते अत्यंत संतुष्ट असायचे, त्यामुळे ते राज्य चालवणं तितकंसं कठीण नव्हतं.नंतरच्या काळात आणखी एक सरकार येऊन गेलं.

मात्र त्या सरकारच्या मागे बाळासाहेब ठाकरेंसारखं खंबीर नेतृत्त्व ठामपणे उभं होतं म्हणून ते सरकार चाललं. त्यांनी मार्गदर्शक म्हणून उत्तम काम केलं त्यामुळे त्या सरकारलाही कोणतीही अडचण आली नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही’ या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते.

हेही वाचा l अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री झालेत अर्धे डॉक्टर

तसंच या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here