अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री झालेत अर्धे डॉक्टर

ajit-pawar-uddhav-thakeray-important-statement-about-mahavikas-aaghadi-government
ajit-pawar-uddhav-thakeray-important-statement-about-mahavikas-aaghadi-government

मुंबई l कोरोनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav thakeray आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh tope यांचा इतका अभ्यास झाला आहे की ते अर्धे डॉक्टर झाले आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्त एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा करोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला असंही ते म्हणाले.

गंमतीचा भाग सोडा पण आपण कोरोना काळ असूनही खूप चांगलं काम केलं आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत.

आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आलं नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केला.

आता पुढची चार वर्षे महाविकास आघाडी सरकार हे यशस्वी आणि दमदार वाटचाल करेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही. आपण एकजुटीने काम करतो आहोत यापुढेही आपल्याला असंच काम करायचं आहे.

हेही वाचा l सोलापूरचे शिक्षक डिसले १४० देशातील शिक्षकांमधून अव्वल, ७ कोटींचा पुरस्कार पटकावला

गेल्या वर्षभरात अनेक अडचणी आल्या. तरीही लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणार नाही या पुस्तकाचं प्रकाशन आज करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडी सरकारचे सगळे मंत्री उपस्थित होते.

तसंच या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.

हेही वाचा l vodafone-idea युजर्सना झटका, युजर्सना मोजावे लागणार जास्त पैसे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here