शरद पवारांनी NDA सोबत यावं, भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं – रामदास आठवले

sharad-pawar-should-join-nda-there-is-no-advantage-staying-with-shiv-sena-says-rpi-ramdas-aathawle
शरद पवारांनी NDA सोबत यावं, भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं – रामदास आठवले sharad-pawar-should-join-nda-there-is-no-advantage-staying-with-shiv-sena-says-rpi-ramdas-aathawle

मुंबई : केंद्रीय मंत्री राज्यमंत्री, रिपाई (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष रामदास आठवले ramdas-aathawle यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ऑफर दिली आहे. काही दिवसांपूर्वी आठवलेंनी शरद पवारांना राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा, काँग्रेसचं अध्यक्षपद द्या असं विधान केलं होतं. आता जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं. शिवसेनेसोबत राहण्यात काहीच फायदा नाही. असंही रामदास आठवले म्हणाले.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येणार का अशा चर्चांना  उधाण आलं. रामदास आठवले यांनी याप्रकरणावर बोलत असताना, शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपासोबत येण्याची विनंती केली आहे.

वाचा : रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला होता हा सल्ला 

काही दिवसांपूर्वी रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करुन शरद पवारांना काँग्रेसचं अध्यक्ष करावं असंही विधान केलं होतं. दरम्यान, राऊत-फडणवीस भेटीनंतर राज्यांत चर्चांना उधाण आलं असलं तरीही महाविकास आघाडी सरकार हे त्यांच्यातील विरोधामुळेच पडेल, आम्हाला यासाठी काहीही करावं लागणार नाही अशी भूमिका भाजपा नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे याप्रकरणी भविष्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here