जनतेची माफी मागत पंतप्रधानांनी दिला राजीनामा!

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आजारामुळे त्रस्त

shinzo-abe-resigns-as-japan-prime-minister amid health issues
shinzo-abe-resigns-as-japan-prime-minister amid health issues

जपान :  जपानचे पंतप्रधान शिंजो आबे काही महिन्यांपासून आजाराशी लढा देत आहेत. आजारामुळे जबाबदारी पार पाडणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (shinzo-abe-resigns-as-japan-prime-minister -amid health- issues)

पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना शिंजो आबे भावूक झाले. आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम नसल्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागितली. त्याचबरोबर “मी ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला प्रचंड वेदना होत आहेत,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे प्रकृतीच्या कारणांमुळे पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. दिवसोंदिवस प्रकृती खालावत चालल्याने त्याचा परिणाम सरकारवर आणि सरकारी कामावर होऊ नये यासाठी आबे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचंही वृत्त होतं.

दीर्घ आजारामुळे आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी जनतेची मनापासून माफी मागतो. कारण मी माझं कर्तव्य पार पाडण्यास सक्षम नाही. मी काही उद्दिष्ट निश्चित केली होती. ती पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागत असल्यानं मनाला वेदना होत आहेत,” अशा भावना आबे यांनी व्यक्त केल्या.

पंतप्रधानपदासाठी यांच्या नावाची चर्चा

जपानचे अर्थमंत्री तारो असो, माजी संरक्षण मंत्री शिगेरू इशिबा, परराष्ट्र मंत्रीपदी काम केलेले फुमिओ किशिदा, संरक्षणमंत्री तारो कोनो यांच्या नावांची पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here